Sunday, July 6, 2008
मलाही girl friend मिळावी
मलाही girl friend मिळावीसुंदर मुलीशी ऒळख व्हावी,आम्हा दोघांची मने जुळावी ।हातात हात घालून फ़िरणारी,मलाही girl friend मिळावी ॥हास्याच्या पहिल्या किरणाने,प्रितीची खळी उमलावी ।डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,रूपाची ती राणी असावी ॥अशीच माझी स्वप्नसुंदरी,ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।हातात हात घालून फ़िरणारी,मलाही girl friend मिळावी ॥चौपाटीवर पाणीपूरीतून,प्रणयाचेच घास भरवू ।रिक्षात मीटरला साक्षी मानून,प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥आयुष्यातील सारी दु:खं,जिच्या सहवासात टळावी ।हातात हात घालून फ़िरणारी,मलाही girl friend मिळावी
प्रेम करणं सोपं नसतं................
प्रेम करणं सोपं नसतंसर्व करतात, म्हणून करायच नसतं चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतंपुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतंतर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतंकारण प्रेम करणं सोपं नसतंशाळा कॉलेजांत असच घडतंएकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतंज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतंकरीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतंसहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतंकारण प्रेम करणं सोपं नसतंहॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतंपैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतंफोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतंमग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतंडोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतंआनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतंएवढ सगळं करणं खुप कठीण असतंकारण प्रेम करणं सोपं नसतं................
आठवण आली तुझी की,नकळत डोळ्यांत पाणी येतं..
आठवण आली तुझी की,नकळत डोळ्यांत पाणी येतं..मग आठवतात ते दिवसजिथं आपली ओळख झाली..आठवण आली तुझी की,माझं मन कासाविस होतंमग त्याच आठवणीना..मनात घोळवावं लागतं..आठवण आली तुझी की,वाटतं एकदाच तुला पाहावंअन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..पण सलतं मनात ते दुःख..जाणवतं आहे ते अशक्य...कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...पण तरिही.........आठवण आली तुझी की,देवालाच मागतो मी....नाही जमलं जे या जन्मीमिळू देत ते पुढच्या जन्मी....
Subscribe to:
Posts (Atom)