Thursday, June 19, 2008

प्रेम
तू नेहमीच धडपडायचातिला आपलेसं करण्यासाठीतुला मदत करता करतानकळत मीहि धडपडायचीतुला आपलेसं करण्यासठीव्हायचं तुमचं लुटुपुटीचं भांडणअन् मग तुमचं ते रुसणं फूगणंमीच बनायचे मग मध्यस्थअन् द्यायचे तुमचे हात एकमेकांच्या हातातजायचो आपण डोंगरदऱ्यात फिरायलाभटक भटक भटकायचोअन् मग तुम्हाला एकांतात सोडूनपापण्यातले अश्रू लपवतखिळवायची मी नजर पुस्तकाच्या पानावरतिचं ते माझ्या नावावर घराबाहेर पडणंतुमचं ते फिरायला जाणंमाझं मग बागेतल्या कोपऱ्यातशून्यात नजर लावून तुमची वाट पहाणंकधीतरी वाटायचंदेत आहोत आपणच आपल्या प्रेमाची आहूतीपण दुसऱ्याच क्षणी उमगायचंप्रेम् असतं फ़क़्त देण्यासाठीधडपडूच नये ते आपलेसं करण्यासाठी .
माझं प्रेम आहे..........
अंगणातल्या झाडावरझाडांच्या फूलांवरफूलांच्या गंधावरमाझं प्रेम आहेकाळ्याकुट्ट ढगांवरपावसाच्या पाण्यावरपाण्याच्या थेंबावरमाझं प्रेम आहेमळक्या पायवाटेवरसमुद्राच्या लाटेवरशेतातल्या मोटेवरमाझं प्रेम आहेमणसातल्या देवावरदेवातल्या माणसावरसाऱ्या देवमाणसांवरमाझं प्रेम आहेजगातल्या साऱ्यांवरसाऱ्यांच्या जगावरमाझं प्रेम आहेकारण.....माझं माझ्या आयुश्यावर प्रेम आहे.
मी सुखीच राहिलो
मी होतो भिकारी अन् भीकारीच राहीलोभरभरुन देउन सारे ,भरलेलाच राहीलोजो तो मजला सांगित दुःखे ,भावनांशी खेळून गेलामज ऐकण्या कुणी न उरले ,मी सुखीच राहिलोकधि इथे अन् कधी तीथे,सारे मजला शोधीत होतेसापडुन मग साऱ्यानांही ,हरवलेलाच राहीलोमी नव्हतो कुणाचा ,कूणीही माझे नव्हते कधीआप्त स्वकीयांच्या घोळक्यात,मी परकाच राहीलोझाडावरच्या पक्ष्यांनाही, त्यांनी दगड मारलेते हात जाहले, अन् मी दगड जाहलो.
बरसावं तर .............
बरसावं तर श्रावणासारखंअगदी हळूवारबरसतानाही ढगाआडूनधरावी मायेची उबारबरसता बरसता अचानककधी बसावे लपूनढगाआडून डोकवावं बनूनसोनसळी उन.मोग-याजवळ रहावं साचूनछानसं तळं बनूनझूळझुळ करीत जावे कधीझ-यासंगे वाहून .बरसावं तर अगदी असंचजावी स्रूष्टी मोहरूनबरसण्यानेही आपुल्या जावेसा-यांचे चित्त सुखावून .कधीतरी जावे मगनकळत निघूनगेल्यानंतरही ह्रदयात कुणाच्याअसावे हिरवळ बनून .
आठवणींचे पुस्तक
कधी अचानक वा-राची झुळूक येतेमनाचा तळ ढवळून काढतेखोलवर कुठेतेरी दडलेल्या आठवणींनाअलगद वर आणून ठेवते .आणि मग आठवणींत रमतं मनपिंजलेल्या कापसाच्या पुंजक्या सारखेतरंगु लागते हेलकावे खातभुतकाळाच्या वा-रावर.प्रत्येक आठवणीपाशी क्षणभर थांबतकधी नकळत पापणी ओली करतकधी ओठांवर हास्य फूलवतआठवणींचे चित्र रंगवते डोळ्यांवर .मग कधीतरी मन अलगद था-यावर येतेनजरे समोर पुस्तकाचे पान फडफडत असतेअन तरीही हे वेडे मन ..........रेंगाळत असते आठवणींच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर .

marathi

आई........
एक वठलेला व्रुक्ष उभादेत आधार वेलाला त्यानाही शक्ती तरिही कसाबसातग त्याने धरलेला.तोच शक्ती वेलाची त्यातोच त्याची भक्तीतोच त्याची प्रेरणा अन्तोच त्याचे अस्तित्वही.कसली ही वेडी माया ?खरेच मजला ठाउक नाहीआहे ठाउक एकच मजलाम्हणतो मी त्यास आई.

matrathi kavita

भारलेले स्तब्ध सारे..........
भारलेले स्तब्ध सारेगोठलेले चन्द्र तारेनिश्चल ही धरा आणिकथांबलेले ऊधाण वारेसाचलेले काही नारेरेंगाळलेले काही पुकारेएक अनामिक करकर करतीउघडी सताड सारी दारे.कधी तरी उठतात पहारेभानावर येते सारेएक बदल जाणवतो मात्रभासतात हे वारे खारे.