मी सुखीच राहिलो
मी होतो भिकारी अन् भीकारीच राहीलोभरभरुन देउन सारे ,भरलेलाच राहीलोजो तो मजला सांगित दुःखे ,भावनांशी खेळून गेलामज ऐकण्या कुणी न उरले ,मी सुखीच राहिलोकधि इथे अन् कधी तीथे,सारे मजला शोधीत होतेसापडुन मग साऱ्यानांही ,हरवलेलाच राहीलोमी नव्हतो कुणाचा ,कूणीही माझे नव्हते कधीआप्त स्वकीयांच्या घोळक्यात,मी परकाच राहीलोझाडावरच्या पक्ष्यांनाही, त्यांनी दगड मारलेते हात जाहले, अन् मी दगड जाहलो.
No comments:
Post a Comment