भेटशील मला तू जेव्हाकाय माहीत केव्हाआवडतेस तू मलाहे तू एकदा बोलशिल ना?एकदा तरी हातात हातआणि डोळ्यात डोळेघालून तू जवळ माझ्याएक संध्याकाळ बसशिल ना?मी आणि पान फूलसर्व पक्षी - बिक्षीभिजतील या पावसाततेव्हा तू माझ्या सोबत असशिल ना?मी असें एकटी एकटीरात्रीच्या उदास गर्भातखिडकीतून मग तू हळूचहोऊन चंद्र डोकावशिल ना?वैशाख वणवा लागलामाझ्या आयुष्याला उभाउजाड माळरान झाल आयुष्यमग तू गुलमोहर बनून छाया देशील ना?मी नसेन कुठेच तुझ्याआयुश्यात आणि स्वप्नाततू मग्न असणार पण तुझ्याच विश्वातपण अश्रू बनून माझ्या डोळ्यात तू राहशील ना??
No comments:
Post a Comment