ए….तू रागाऊ नकोस रे…मी नाही म्हणनार नेहमीकवितेला तुझ्या प्रत्येकसुंदर,छान,अप्रतिम,तुफान..
मी होणार आहे तुझी टीकाकारहो टीकाकारच…..विचार ना का????
वाटत तुझ्या शब्दाणी खूप खूप बोलावगूढ-गूढ,खोल खोल आशय घन असावरथी-महारथीच्या बरोबरीला तू यावआणि मग तुला कोणी स्पर्धकच ना उराव.
मी होणार आहे तुझी टीकाकारहो टीकाकारच……विचार ना का???
वाटत तुझ्या कवीतानी खूप भरारी घ्यावीवेगवेगळ्या विषयांची त्याला छान झालर असावीकवितेची प्रत्येक ओळ अर्थपूर्ण असावीउगाच त्याच त्याच विषयांची नेहमी गर्दी नसावी
मी होणार आहे तुझी टीकाकारहो टीकाकारच……..विचार ना का?????
वाटता माझी टीका तू खूप मनावर घ्यावीआणि एक-एक रत्न तुझ्या लेखणीतून बाहेर पडावितुझ्या कविता ह्या प्रान्तातल्या शेवटचा शबद ठरावातुझ्या नंतर तुझ्या कविता अनमोल होऊन उराव्या
मी होणार आहे तुझी टीकाकारहो टीकाकारच……विचार ना का???
वाटत व्हाव विराजमान तू प्रसिद्धीच्या शिखरावरअस्सल प्रतिभा खणखनावी तुझ्या प्रत्येक कवितेतूनपाहीन मी ईथुन तुला यशाच्या खुर्चिवरअश्रू असतील डोळ्यात माझ्या आनंदाचे भरभरून
मग होऊ ना मी टीकाकार तुझी…ए……..तू रागाऊ नकोस रे
No comments:
Post a Comment