मी गातो माझे गाणे ..
मी गातो माझे गाणे संगे घेऊनी गिटारतुझ्या मनातले सुर आणी शब्दांचे उकारमी गातो माझे गाणे ..माझ्या प्रितीचा सुवास सखे येतो का तुलाही ?कधी हसशील तुही, कधी देशील होकार ?मी गातो माझे गाणे ..आता पाऊस सरला, आणी सरला श्रावणतरी भिजण्याचे वेड, कसे अजुन अपार ?मी गातो माझे गाणे ..पुन्हा मिठीशी पहातो तुला, हरवतो भानआणी उघडता डोळे, प्रिया नाही कोठे दुरमी गातो माझे गाणे ..( कुणा कुणाला सांगावे, काय अवस्था मनाचीकधी असते पाखरु कधी उडता कापुर )आता विरहाचा सुर पुन्हा पेटाया लागलाकशी माझीच कविता सखे झालीया फितुर ?मी गातो माझे गाणे ..
No comments:
Post a Comment